Header AD

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया मध्ये धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचे ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 

रुग्णालयाचा कायापालट करणार : पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे...


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये हळूहळू जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून काही दिवसात या रुग्णालयाचा कायापालट करण्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.

         

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून माजी महापौर व नगरसेविका सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे जागतिक दर्जाचे धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचे लोकार्पण आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास खासदरार राजन विचारे, आमदार रविंद्र पाठक, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशो‍क वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, क्रिडा व समाज कल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती कु. प्रियंका पाटील, आरोग्य परिक्षण व वैद्यकिय समिती अध्यक्ष सौ. निशा पाटील, स्थानिक नगरसेविका सौ. अर्पणा साळवी, नगरसेवक रमाकांत मडवी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, वैद्यकिय  आरोग्य अधिकारी डॅा. मुरुडकर, प्लॅटिनम हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅा. संजित पॅाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका पॅाल उपस्थित होते.


यावेळी बोलताना ना. एकनाथ शिंदे यांनी प्लॅटिनम हॅास्पीटल आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिब ठाणेकरांना अतिशय अत्यल्प दरामध्ये सुविधा देण्यात येणार असून या उपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये टू डी इको पासून ते ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, स्टेंन्ट टाकणे, याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह तदनुषंगिक विविध उपचार हे विनामूल्य दिले जाणार आहेत.


महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधीन असणाऱ्या नागरिकांना हे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. त्याशिवाय अन्य नागरिकांना अतिशय नाममात्र दरात हृदया रोगासंबंधीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग उपचार केंद्रा मध्ये १०० बेड्सची योजना असून आज रोजी त्यातील ७० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया मध्ये धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचे ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया मध्ये धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचे ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads