रामदासवाडी प्रभागात रस्त्याच्या काँक्रीटी करणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका प्रियांका विद्याधर भोईर यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २५ रामदासवाडीमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आला. या कामासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रियांका विद्याधर भोईर यांनी पालिका पाठपुरावा केला होता. पालिका प्रशासनाने या कामाला मंजुरी दिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
प्र.क्र.२५ रामदासवाडी प्रभागातील ब्राह्मण सोसायटी, वसुधा अपार्टमेंट, सिद्धिविनायक हॉस्पिटल ते गणेश मंदिर, चिंतामणी अपार्टमेंट येथील रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी नगरसेविका प्रियांका भोईर यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत भोईर यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली. या कामाला मंजुरी मिळाल्याने नगरसेविका भोईर यांच्या विकास निधीतून होणाऱ्या या रस्त्याच्या क्राँकिटीकरणाचे भुमिपुजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी स्थानिक नगरसेविका प्रियंका भोईर, नगरसेविका शालिनी वायले, महिला विभाग संघटक निमा एखंडे, शिवसेना विभागप्रमुख माजी नगरसेवक विद्याधर भोईर, सुनील वायले, स्थानिक शाखाप्रमुख सुजित मोरे, उपशाखाप्रमुख संदिप पवार, राजेंद्र पालांडे, युवासेना उपविभाग अधिकारी अक्षय एखंडे, सायबर सिक्युरिटी सेलचे धर्मेंद्र नलावडे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे विजय देशेकर, रमण तरे, राजेश लोंढे, किशोर डुंबरे, दिनेश शिंदे, जितेंद्र भंडारी, सुधिर कंक आदींसह परिसरातील नागरीक व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment