आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून ओपन जिम, क्रांतिकारक स्मृती स्मारक, जेष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण
कल्याण , कुणाल म्हात्रे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ओपनजिम, क्रांतिकारक स्मृती स्मारक आणि जेष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकापर्ण आमदारांच्याहस्ते करण्यात आले.
आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे फार महत्व आहे. धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायाम हा महत्वाचा आहे, याच पार्श्वभूमीवर पोलीस बांधवांचे आरोग्य व स्वास्थ्य निरोगी राहण्याच्या हेतूने कल्याण पुर्वेतील कोळशेवाडी पोलिस स्टेशन येथे माझ्या आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीमधून पोलिस बांधवांसाठी बनविण्यात आलेल्या ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे खडेगोळवली येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात आमदार निधी मधून बनविण्यात आलेल्या ओपन जिमचे देखील लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक विक्रम तरे, नगरसेविका मोनाली तरे, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पूर्व व्यापारी मोर्चा अध्यक्ष मनोज माळी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी व नागरिकांचा मूलभूत हक्क मिळण्याच्या दृष्टीकोनाने असंख्य क्रांतिकारकांनी अफाट संघर्ष, त्याग व बलिदान दिले आहे. समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम क्रांतिकारकांनी केले आहे. आपल्या क्रांतिकारकांचे काम व त्यांचे स्मरण आपल्या येणाऱ्या पिढीला होणे गरजेचे आहे, याच उद्देशाने स्मृती स्मारकांची उभारणी होते. कल्याण पुर्वेतील 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालया शेजारी आमदार निधी मधून जेष्ठ नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक कट्टा व राष्ट्रीय विचार प्रबोधिनीच्या संकल्पनेतून साकारलेल्या क्रांतीकारक स्मृती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, नगरसेविका सुनिता खंडागळे, शीतल मंढारी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष विजयजी उपाध्याय, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, जेष्ठ पत्रकार व राष्ट्रीय विचार प्रबोधिनीचे अध्यक्ष दिवाकर गोळपकर, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, रोटरी क्लबचे अध्यक्ष वाणी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.
Post a Comment