Header AD

भाजप नगरसेवकाच्या वडीलांनी केला पत्नीचा खून

 

◆खून करून मृतदेह  जाळण्याचा धक्कादायक  प्रकार....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  दोन दिवसापूर्वीच पत्नी गावाला येत नसल्याच्या वादातुन पतीने पतीची घटना डोंबिवली घडली असतानाच शनिवारी रात्री  कल्याण डोंबिवली महापालिकेचे  नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या वयोवृद्ध वडिलांनी कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीचा म्हणजेच  नगरसेवक रामकांत पाटील यांच्या वयोवृद्ध आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे ते राहात असलेल्या गोळवली परिसरात खळबळ माजली आहे.


बळीराम पाटील हा ८४ वर्षांचा वयोवृद्ध आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. बळीरामची ८० व पत्नी पार्वती पाटील हिच्या बरोबर  काही कौटुंबिक वाद झाला होता. या वादात झालेल्या भांडणात बळीराम पाटील यांनी रागाच्या भरात त्यांची पत्नी पार्वती हिच्या वर सपासप तीक्ष्ण हत्त्याराने वार करीत तिचा खून केला. यावरच बळीराम थांबले नाहीत तर नंतर त्यांनी नंतर पार्वतीचा मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न केला. 


ही घटना पाटील कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी पार्वती या वृद्धेस हॉस्पिटलमध्ये मध्ये घेऊन गेल्यावर तेथे तिचा मृत्यू झाला होता. हे कृत्य केल्यावर बळीराम पाटील याने हत्या केल्याच्या ठिकाणाहुन पळ काढला पण नंतर मानपाडा पोलिसांनी बळीराम पाटील यास अटक केली.


शनिवारच्या रात्री ही घटना माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांच्या राहत्या घरीच घडली. रात्री जेवण करून रामकांत पाटील यांचे वडील व आई जेवण करून वरील खोलीत झोपायला गेले. सकाळी साडे आठ वाजता घरातील सून जेव्हा त्यांना उठवायला गेली तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिला हादरा बसला. समोर सासू पार्वती ही  जळालेल्या अवस्थेत दिसून आली. यावर घरातील कुटुंबीयांनी तिला हॉस्पीटलमध्ये नेले पण तेथे ती मृत झाल्याचे सांगण्यात आले.
भाजप नगरसेवकाच्या वडीलांनी केला पत्नीचा खून भाजप नगरसेवकाच्या  वडीलांनी केला पत्नीचा खून Reviewed by News1 Marathi on January 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads