Header AD

कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

 डोंबिवली ,  शंकर जाधव :  डोंबिवली शहर कॉंग्रेस कमिटी बी ब्लॉक पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रणव केने यांच्या वतीने पूर्वेकडील प्रभाग क्र.७७ दत्तनगर येथील नागेश्वर नवनाथ धान्य मंदिर शेजारील मैदान,संतोष केणे ऑफिससमोर शेजारी, जुना आयरे रोड येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सचिव संतोष केणे, माजी ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक रवी पाटील,डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख,निशिकांत रानडे,गणेश चौधरी, अभय तावडे,अशोक कापडणे,शरद भोईर,बिजू राजन,निलाॅन जॉय, सुशील सामंत, निस्सार सय्यद, सुजाता परब शिल्पा पावले, वंदना जगताप, वर्षा जगताप, सुषमा कांबळे, संगीता नाईक,शिला भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.


या शिबिरात  रक्त चाचणी, मधुमेह, किडनी संबधित तपासणी, लिव्हर, कॉलेस्तोल,कॅलशियम लेव्हल तपासणी करण्यात आले. शिबिरात सर्व तपासणी व मातृत्व वंदन योजना नोंदणी मोफत करण्यात आले.या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी प्रणव केणे म्हणाले,आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या आरोग्याकडे आवश्यक लक्ष देत नाही. आयोग्याकडे लक्ष दिले नसल्याने वयोमानानुसार अयोग्याबाबतच्या तक्रारी वाढतात अश्यावेळी डॉक्टराकडे तपासणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच कॉंग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर भरविले.

कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत मोफत आरोग्य शिबीर संपन्न Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads