सावित्री बाईंची जयंती साजरी निमित्त विविध क्षेत्रात उल्लेख नीय काम करणाऱ्या महिलांचा भाजपा कडून सन्मान
डोंबिवली , शंकर जाधव : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा सुहासिनी राणे,माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, रेखा चौधरी यांसह भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, जिल्हा सचिव रविसिंग ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसूर्य सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.यावेळी डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवरील अपेक्स हॉस्पिटलच्या परिचारिका सृष्टी जाधव, मायी कदम,रोशनी रेवडेकर, सुगंदी गिरकर,रेश्मा परब( कर्मचारी ),समीक्षा देसाई ( कर्मचारी)डॉक्टर मीरा,महिला पत्रकार राजलक्ष्मी पुजारे-जोशी,भाग्यश्री प्रधान-आचार्य,अंकिता केळकर आदींसह अनेक महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते`कोरोना योद्धा`प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा सुहासिनी राणे म्हणाल्या,महिलांनीच महिलांना मदत करणे महत्वाचे आहे.
नारी शक्तीची ताकद मोठी आहे. मुली शिकल्या तर देशाची प्रगती होईल हे धोरण जाणून मुलींना शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय सावित्रीबाई फुले यांनी घेतला. या निर्णयाचा फायदा भारताला झाला आहे मात्र अद्यापही महिलाच महिलांचा द्वेष करतात.हा अवगुण महिलांनी सोडला तर खरी सावित्रीबाईंची जयंती साजरी होईल असे सांगितले. कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी सरसावलेल्या सावित्रीबाईंना अभिवादन करताना महिलांनीच महिलांची विचारधारा बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले.
तर डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब म्हणाले, सर्व महिला माझ्या माता आणि भगिनीच आहेत.प्रत्येकाचे आयुष्य घडवण्यासाठी महिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मुलगी शिकली पाहिजे आणि त्यासाठी समाजातील महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन रश्मी येवले केले.

Post a Comment