Header AD

भिवंडीत ५६ पैकी ३० ग्राम पंचायतीत भाजपाचे कमल फुलले

 
भिवंडी ,
 शंकर जाधव  :
  भिवंडी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींवर भाजपाने निर्विवाद बहूमत मिळविले आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर मात केली आहे. भिवंडीती काल्हेरशेलारपुर्णा ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या. तालुक्यातील ५६ पैकी ३४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे.


भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यातील वळआलिमघरनिवळी आणि चिंचवली-खांडपे ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सहमती झाली होती. मात्रउर्वरित ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका चुरशीच्या मानल्या जात होत्या. भाजपाविरोधात शिवसेनाराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र आली होती. 


मात्रखासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला चांगलेच यश मिळाले. तालुक्यातील ५६ पैकी ३० ठिकाणी भाजपाला निर्विवाद बहूमत मिळाले. तर आणखी चार ठिकाणी भाजपाला युतीच्या माध्यमातून सत्ता मिळणार आहे. तालुक्यातील काल्हेरशेलार या दोन्ही श्रीमंत ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. खासदार कपिल पाटील यांच्या गावातील दिवेअंजूरमध्येही भाजपाचा झेंडा फडकला. 


पुर्णामाणकोलीपिंपळासझिडकेकुकसेओवळीलामजलाखिवलीवडघरडुंगेजुनांदुर्खीअंजूरपिंपळनेर आदी ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तर खारगाव व निंबवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. खासदार कपिल  पाटील  म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्रगेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारकडून भिवंडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाला मतदारांनी पसंती दिली.
भिवंडीत ५६ पैकी ३० ग्राम पंचायतीत भाजपाचे कमल फुलले भिवंडीत ५६ पैकी ३० ग्राम पंचायतीत भाजपाचे कमल फुलले   Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads