कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५८ हजारांचा टप्पा
◆१२४ नवे रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही
५८,०३४ एकूण रुग्ण तर १११० जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत ११८ रुग्णांना डिस्चार्ज...
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ५८ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या १२४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर गेल्या २४ तासांत १८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या १२४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,०३४ झाली आहे. यामध्ये ९०३ रुग्ण उपचार घेत असून ५६,०३४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०, कल्याण प – ४०, डोंबिवली पूर्व –४५, डोंबिवली प – २२, मांडा टिटवाळा -५ तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, २ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Post a Comment