भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी वाडा रस्त्यावरील तालुक्यातील ग्रामीण भागात वीज वितरण करणाऱ्या अंबाडी येथील कार्यालयास वीज
ग्राहक नागरिकांनी टाळे लावून अधिकाऱ्यास बाबत जाब विचारण्यासाठी कार्यालयावर पुन्हा एकदा आंदोलन करीत वाढीव वीज बिला बाबत कोणतेही निराकरण न केल्या बद्दल व अपुरा कर्मचारी वर्ग पूर्ण वेळ अभ्यासात नसल्याने प्रत्येक तक्रारी साठी वाडा येथे हेलपाटे खाणे या बाबींचा जाब विचारला.
भिवंडी वाडा रस्त्यावरील अंबाडी परिसरातील तब्बल ९० गावातील वीज वितरण व वीज बिल वसुली साठी अंबाडी येथे महाराष्ट्र वीज वितरण विभागाचे कार्यालय असून कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिल संदर्भात त्या सोबत या कार्यालयात रिक्त पदे तात्काळ नेमणूक करावीत पूर्णवेळ अभियंता नेमून करावी अशा मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात
ग्रामस्थांनी अंबाडी येथील कार्यालया बाहेर निदर्शने करीत येत्या दहा दिवसांत तक्रारींचे निवारण न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता या आंदोलनात जया पारधी ,आशा भोईर, नवनाथ भोये, ओमकार पारधी ,आकाश भोईर, रुपेश जाधव,तारामती जाधव,शर्मिला पवार,सीताबाई पवार यांसह वीज ग्राहक सहभागी झाले होते .
Post a Comment