नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी बाबत रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक कोअर कमिटी ची बैठक संपन्न
नवी मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक कोअर कमिटी ची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व निवडणूक कोअर कमिटीचे अध्यक्ष मा. आमदार सुमंत राव गायकवाड व जिल्हा निरीक्षक बाळासाहेब मिरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथे पार पडली.
रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी एकवीस इच्छूक उमेदवारांची यादी पक्षाच्या निवडणूक कोअर कमिटी चे अध्यक्ष सुमंतरव गायकवाड यांच्या कडे सुपूर्द केली असून उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती सर्वानुमते पंधरा इच्छूक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली येत्या दोन दिवसात सदर यादी पक्षाध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब यांच्याकडे देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्म म्हणून शिवसेनेचे खासदार आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदारांना निवडून आणण्याचे काम रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची युती भाजपसोबत असून येत्या दोन दिवसांत भाजपचे स्थानिक नेत्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले आहे.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंत राव गायकवाड, जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, जिल्हा निरीक्षक बाळासाहेब मिरजे, सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, ठाणे लोकसभा अध्यक्ष ॲड. यशपाल ओहोळ, आयटी सेल चे महा. प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई बोदडे, सचिव रमेश बोदडे, संघटन सचिव संतोष ढेपे, युवा उपाध्यक्ष विशाल कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment