कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या वतीने कच्छी जैन फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तदान आणि अंगदान जागृती अभियानाला उत्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली , शंकर जाधव : कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेच्या वतीने कच्छी जैन फाउंडेशनच्या सहकार्याने एकरवाला रक्तदान अभियान आणि प्रिन्स अंगदान जागृती अभियान डोंबिवली पूर्वेकडील नवनीत नगर येथील कक्युनिटी सभागृहात संपन्न झाले.या शिबिराचे सहयोगी दाता मातोश्री जवेरबेन खुशालचंद गंगर होते.मुख्य पाहुणे म्हणून जिग्नेशभाई देढीया आणि समाजसेविका भारतीबेन संगोई आणि विशेष अतिथी हितेन भाई कांतीलाल बोरिचा होते.अनिलभाई ठक्कर, दिनेशभाई गोर,हेमंतभाई धुल्ला,मुकेशभाई आणि हरीशभाई गाला,भाईलालभाई गाला,राजेश भाई छेडा, रुपसिंघ धल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.या शिबिरासाठी कच्छ युवक संघचे फाऊडर कोमलभाई छेडा,आणि प्रमुख धीरजभाई छेडानी शुभेच्छा दिल्या.
उपप्रमुख भरतभाई गोगरी आणि ट्रस्टी दिलीपभाई रांभिया यांनी शिबिरात उपस्थिती दर्शविली.या शिबिरात १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ११० अंगदान जागृती अभियानचे फोर्म भरले.डोंबिवलीमध्ये कच्छ संघाच्या वतीने गेल्या १ दिवसात के.वी.वीरा स्कूल,गोपालनगर, गोग्रासवाडी आणि नवनीतनगर येथून ४ शिबीर संपन्न झाले.या शिबिरात एकूण ५०१ युनिट रक्तदान झाले आणि २०६ जणांनी अंगदानचे फोर्म भरले. डोंबिवली शाखेच्या वतीने कोरोबारी सभ्य दिनेशभाई शेठीया,दिनेश नागडा,धीरज भाई लालन,पालकमंत्री हितेंद्र भाई गडा,संयोजक राजेश मारू, सह संयोजिका चारूल मारू, ब्लड कन्वीनर पंकज काराणी आणि सचिन सावला, अंगदान कन्वीनर इलेश धराडे आणि आमिष केनिया, घर कन्वीनर चिमनभाई गोसर आणि कच्छी युवक संघचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून सेवा दिली.
या शिबिरात चायचे सहयोगी दाता मातुश्री मणीबेन रामजी गाला हे होते. कच्छ युवक संघचे प्रमुख धीरज छेडा आणि सर्व वीर रक्तदाता आणि ज्यांनी सहयोग दिले त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.विशेष म्हणजे एखाद्याला रक्ताचा तुटवडा जाणवत असेल तर कच्छ युवक संघ नेहमी त्यांना सहकार्य करून मोफत रक्ताच्या पिशव्या दिल्या जातात. कच्छ युवक संघ डोंबिवली शाखेने आजवर अनेक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविले असून त्यामाध्यमातून गरजूंना मदत केली आहे.
कच्छ युवक संघची स्थापना १९८५ साली झाली.संघाच्या स्थापनेपासून आजवर आरोग्य शिबीर, लहान मुलांच्या आरोग्य शिबीर, महिला दिन, मॅरेथाॅन असे अनेक उपक्रम राबविले गेले. गुजरात राज्यातील कच्छ येथे कच्छ युवक संघाच्या मदतीने २२०० विद्यार्थी शिकत आहेत. कोरोना काळात कच्छ युवक संघाने अनेकांना मदत केली. कच्छ युवक संघाच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. तर १६० कोविड प्लाझा देण्यात आले.

Post a Comment