Header AD

कल्याण-डोंबिवलीत बर्ड फ्लूचे संकट.. बगळे, कबुतरे व कावळे मृत्युमुखी.. .

डोंबिवली , शंकर जाधव  :  महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली बगळे, कबुतरे आणि कावळे बर्ड फ्लूने मृत्युमुखी पडत आहेत. मंगळवारी कल्याणात दोन पान बगळेमोहने परिसरात कबुतरेतर डोंबिवलीतील कोपर गावात दोन कावळे मृत्युमुखी पडले आहेत. भर वस्तीत हे पक्षी तडफडून मरत असल्याने नागरीका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्या समवेत घटनास्थळी दाखल होत या मृत पक्ष्याचे नमुने घेत आहेत. सोमवारी आधारवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एक कावळा मृतावस्थेत सापडला होता.


मंगळवारी  कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा परिसरात दोन पान बगळे, मोहने परिसरात कबुतरे तर डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव परिसरातील गावदेवी परिसरातील कावळ्याचे निवासस्थान बनलेल्या भागात दोन कावळे मृत्युमुखी झाले.  कोपर गावात सकाळपासून एक कावळा तडफडत होता. घशातून विचित्र आवाज काढत पंख पांघरलेल्या हा कावळा जीव वाचविण्यासाठी तडफडत होता. भरवस्तीत तडफडून मरणार्या या पक्ष्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले असून दोन दिवसापासून पक्षी मरत असताना याबाबतची माहिती कोणाला द्यायची असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे. दरम्यान वनविभागाला याची माहिती मिळाल्यावर  वनविभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळी पोचत या पक्ष्याचे नमुने गोळा केले.

कल्याण-डोंबिवलीत बर्ड फ्लूचे संकट.. बगळे, कबुतरे व कावळे मृत्युमुखी.. . कल्याण-डोंबिवलीत बर्ड फ्लूचे संकट.. बगळे, कबुतरे व कावळे मृत्युमुखी.. . Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads