नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी टिटवाळा महागणपती दर्शनासाठी भक्तांची गर्दी
कल्याण , कुणाल म्हात्रे : नवीन वर्षोच्या पहिल्या दिवशी टिटवाळा महागणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची टिटवाळ्यात गर्दी झाली होती. वर्षभर कोरोना महामारीचे सावट सर्वत्र असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक संस्थांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये यासाठी आवाहन करण्यात आल्यानंतर काही काळ मंदिरं, देवस्थाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानुसार सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्तांनी येथील मंदिर शासनाचा आदेश येईपर्यंत मंदिर हे दर्शनासाठी बंद ठेवले होते. मात्र बंदी उठल्यानंतर काहीशी तुरळक गर्दी होती. मात्र आज नवीन वर्षाच्या प्रारंभी महागणपती मंदिरात भक्तांचा महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाच्या नैराश्याने ग्रासलेल्या काळातून नविन वर्षाच्या निमित्ताने बाप्पाच्या आशीर्वादाने उभारी मिळावी असा संकल्प करत नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी आज येथील महागणपती मंदिरात अनेक गणेश भक्तांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला साकडे घालण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळी ६ वाजताच मंदिर बारी दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. गणेश भक्तांची गर्दी हळू हळू वाढत असताना फुल विक्रते, दुकानदार यांच्या चेहऱ्यावर समाधान पाह्यला मिळाले. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या संचार बंदीचा फटका येथील मंदिरावर अवलंबून असलेले फुलविक्रते, मोठे छोटे व्यापारी, काम करणारे कामगार, दुकानदार, फेरीवाले, रिक्षाचालक व एकमेकांवर अवलंबून असणारे उद्योगधंदे यांचे अतोनात नुकसान व हाल झाले. मात्र आज झालेल्या भक्तगणांच्या गर्दीमुळे या सगळ्यांमध्ये एक नवचैतन्य दिसून आले.
Post a Comment