Header AD

ठाकुर्लीत हॉटेल मधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशनजवळील सौभाग्य न्यू किचन या हॉटेलच्या किचन मंगळवारी मध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गॅसवर शिजत असलेल्या कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत हॉटेलमध्ये पत्नीसमवेत जेवायला बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर कुकर आदळला. जखमी ग्राहकाला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनि सचिव सांडभोर यांनी दिली.


या घटनेत  कलाई सल्वन ( ४०, रा. डोंबिवली ) हे गृहस्थ आपल्या पत्नी समवेत सौभाग्य न्यू किचन या हॉटेलात जेवत होते. जेवत असताना किचन मध्ये स्वयंपाकी जेवण बनवत असताना काही कळण्यापूर्वी गॅसवरील कुकरचा स्फोट झाला. कुकर वेगाने उडून समोरच्या टेबलावर जेवत असलेल्या साल्विन यांच्या डोक्यावर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.

ठाकुर्लीत हॉटेल मधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी ठाकुर्लीत हॉटेल मधील कुकरचा स्फोटात ग्राहक गंभीर जखमी Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads