Header AD

वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक


◆तक्रार मागे घेण्यासाठी केली मारहाण केडीएमसी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या मुलाला वारसा हक्काची नोकरी मिळण्यासाठी एका सफाई कामगाराने महानगरपालिकेतीलच सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्याला तब्बल ५ लाख रुपये दिले. मात्र पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने याची तक्रार आयुक्तांकडे केल्याचा राग मानत ठेवून हि तक्रार मागे घेण्यासाठी सफाई कामगाराच्या मुलाला मारहाण केल्याची घटना मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. यामध्ये जखमी इसमावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

       कल्याण पश्चिमेतील शंकरराव चौक येथील कामगार वसाहतीमध्ये राहणारे सफाई कामगार भोला चव्हाण हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून २०१५ साली मुकादम या पदावरून सेवानिवृत्त झाले. चव्हाण हे रुखी समाजाचे असून मागासवर्गीय जातीमध्ये येत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे व लाडपागे समितीच्या आदेशाप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये वारसाहक्क लागू आहे. त्यानुसार त्यांनी आपली नोकरी त्यांचा मुलगा यशवंत चव्हाण याला दिली.

       यानंतर चव्हाण यांच्या शेजारी राहणारे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच गेल्या अनेक वर्षापासून सामान्य प्रशासन विभागात शिपाई म्हणून कार्यरत असणारे किसन घावरी हे त्यांच्याकडे आले आणि तुमच्या मुलाला नोकरी मिळणार नाही, तुमच्याकडे सफाई कामगार असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. मुलाला नोकरी पाहिजे असल्यास अधिकारी लोकांना पैसे द्यावे लागतील असे सांगतिले. चव्हाण यांनी २०१५ पासून नोकरीसाठी अर्ज करून दोन वर्षे होऊन देखील नोकरी न मिळाल्याने किसन घावरी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुरवातील एक लाख रुपये दिले. त्यानंतर देखील घावरी याने चव्हाण यांच्याकडून विविध विभागातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधीत थोडे थोडे करून एकूण ५ लाख रुपये घेतले.

       यानंतरही नोकरी न लागल्याने किसन घावरी याने भोला चव्हाण यांचा मुलगा यशवंत घावरी याला बोलवून घेत एक लाख रुपये दिले. यावेळी यशवंत याने बाकी ४ लाखांबद्दल विचारले असता, हे ४ लाख अधिकाऱ्यांना वाटले असून ते परत मिळणार नाही असे सांगत तुला काही करायचे असेल ते कर अशी धमकी दिली. याबाबत भोला चव्हाण यांनी पालिका आयुक्त आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पत्र देऊन किसन घावरी याची तक्रार केली. केलेल्या या तक्रारीचा राग मनात ठेवून आणि हि तक्रार मागे घेण्यासाठी यशवंत चव्हाण याला बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खंबाळपाडा रोड, टाटा नाका डोंबिवली पूर्व याठिकाणी दोन अज्ञात इसमांनी लाथ मारून लाकडी दांडक्याने डोक्याला मारहाण केली.


       या मारहाणीत यशवंत चव्हाण याला दुखापत झाली असून सुरवातील त्याला डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात आयसीयु मध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी यशवंत चव्हाण याच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी किसन जिवा घावरी आणि इतर दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आपली आर्थिक फसवणूक आणि मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चव्हाण कुटुंबियांनी केली आहे. 
वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads