लोहमार्ग पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गोपचार आरोग्य शिबिराचे आयोजन
मुंबई, ६ जानेवारी २०२१ : सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी 'रेझिंग डे' सप्ताहनिमित्त सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांच्या वतीने व महाराष्ट्र बाजार पेठ अध्यक्ष कौतिक दांडगे यांच्या सहकार्याने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विष्णूच्या पार्श्वभूमीवर आधारित सोमवार (ता.4) रोजी सीएसएमटी स्थानकातील हॉलमध्ये निसर्गोपचार आरोग्य शिबिर कार्यक्रम घेण्यात आला.
'रेजिंग डे' सप्ताहनिमित्त यात केईएम रुग्णालयातील तज्ञ डॉ. सुधीर जुवेकर व डॉ. सविता पोटभरे यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. यात ५० हुन अधिक पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सकारात्मक विचार, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर डोळे, नाक, कान आणि तोंडावाटे तात्काळ शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणूपासून आपला व आपल्या कुटुंबीयांचा तसेच सहकाऱ्यांचा बचाव घराच्या घरी घरगुती औषधोपचार करून बरा होऊ शकतो असे मत डॉक्टर सुधीर जुवेकर यांनी आरोग्य शिबिरात व्यक्त केले.
भारताला सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे. या निसर्गातील हिरवळीत औषधोपचार करणारी वनस्पती आहेत. ज्याचा लाभ प्रत्येक रोग्याला कोणत्याही दुष्परिणामाशिवाय मिळवता येतो त्यामुळे आपण सर्वांनी आजही निसर्गाकडे वळून आयुर्वेदिक निसर्गोपचार उपयोगात आणायला हवे असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यावर असताना घ्यावयाची काळजी व उपाय योजना, रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक तो आहार, व्यायाम कसा व किती प्रमाणात असावा याबाबत प्रात्याक्षिक सादर करत सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान कोरोना पासून बचाव करण्यासाठी व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी मोफत तुलसी ड्रॉप व कोव्हिड किटचे वाटप पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफियर असोसिएशनचे दक्षिण मुंबई जनरल सेक्रेटरी चंद्रशेखर दाते, महाराष्ट्र बाजार पेठ अध्यक्ष कौतिक दांडगे शिक्षक प्रभाकर दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment