Header AD

पडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प

भिवंडी , प्रतिनिधी   :  भिंवडी तालुक्यातील पडघा येथील शिवप्रेमी नागरीक" आबा सांवत" यांनी गावात भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प केला आहे. पडघा गांव ऐतिहासीक वारसा जपणारे व हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरीत असलेले गांव असुन हिन्दु धर्माची पताका असणारा भगवा ध्वज पडघ्यातील सर्व भागात फडकताना दिसावा म्हणुन शिवप्रेमी जेष्ठ नागरिक चंद्रशेखर (आबा) सांवत हे पडघ्यात गेल्या १५ वर्षापासून स्वखर्चाने पथदर्शक भगवे ध्वजपोल उभारुन गावातील व परीसरातील जेष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक, महीला यांच्या हस्ते ध्वजारोहण करत असुन आतापर्यंत गावातील झेंडा नाका वाणी आळी, राम मंदीर सोनार आळी, लक्ष्मी नारायण मंदीर, कान्होबा मंदीर, सुदर्शन नगर, ब्राह्मण आळी, शास्त्रीनगर, गणेश नगर, छत्रपती शाहू महाराज नगर, जय भवानी नाका जरीमरी मंदीर, संत सेना नगर या ११ ठिकाणी कायमस्वरूपी भगवे ध्वजपोल उभारुन ही आगळी वेगळी संकल्पना त्यांनी राबवली असुन खराब, फाटलेले ध्वज स्वखर्चातून वर्षातून चार वेळा बदलण्याचा संकल्प ते नवीन वर्ष चालू झाल्यापासून करतात. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पाची चर्चा परीसरात चांगलीच रंगली असुन परीसरातुन त्यांचे कौतुक होत आहे.
पडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प पडघ्यातील शिवप्रेमी नागरीक गेली पंधरवर्षं भगवा ध्वजारोहणाचा आगळा वेगळा संकल्प Reviewed by News1 Marathi on January 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads