Header AD

कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी राजीव जोशी

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : ६५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी व लेखक राजीव जोशी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदी मिलिंद कुलकर्णी तर सरचिटणीसपदी भिकू बारस्कर यांची निवड झाली आहे. नवी कार्यकारिणीमध्ये विश्वस्त ऍड. सुरेश पटवर्धनप्रशांत मुल्हेरकरचिटणीस आशा जोशी व माधव डोळेखजिनदार दिलीप कर्डेकर असणार आहेत.


नव्या कार्यकारिणीचा कालावधी २०२५ पर्यंत असून या काळात अनेक साहित्यिक उपक्रम तसेच विद्यार्थी व वाचकांसाठी योजना राबवण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाचनालयामध्ये सुमारे पाऊण लाख एवढा पुस्तकांचा साठा असून साडेतीन हजार सभासद आहेत. त्याशिवाय हिंदी व इंग्रजी पुस्तकांसाठी स्वतंत्र ग्रंथालय असून अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथालयदेखील आहे. हे सर्व विभाग आणखी सक्षम करण्यात येतील असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजीव जोशी यांनी सांगितले.

कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी राजीव जोशी कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी राजीव जोशी Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads