Header AD

अखेर वाहतुकीसाठी खुला झाला ‘पत्रीपूल’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाईन उदघाटन


◆अडथळ्यांची शर्यत करायची आणि गती मोजायची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला पत्रीपूल आज अखेर तीन वर्षांनी खुला झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. १०४ वर्षे जुना असलेला हा ब्रिटीशकालीन पत्रीपूल २०१८ मध्ये धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेखासदार डॉ. श्रीकांत शिंदेखासदार कपिल पाटीलआमदार रविंद्र चव्हाणआमदार विश्वनाथ भोईरआमदार गणपत गायकवाडआमदार राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आई तिसाईदेवी उड्डाणपूल अर्थातच नविन पत्रीपूलाचे धुमधडाक्यात लोकार्पण करण्यात आले.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल ? आपण चांगले काम केले तर आपले नआव इतिहासात कसे जोडले जाईल ? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहीजे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे असून कोणत्याही पातळीवर आपल्याला तू तू मे मे होता कामा नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.     तर नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेएमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.

     जुना पत्रिपुल हा १०४ वर्षाचा होता त्यामुळे त्याची इतिहासात गणना होते. उद्घाटन झालेला हा नवीन पत्रिपुल १०० वर्ष टिकेल असे डॉ श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमात म्हंटले. नवीन पूल उभरतान अनेक अडचणी समोर आल्या त्यांना तोंड देत काम सुरू ठेवले. पूल पूर्ण होणार आहे की नाहीकिती दिवस लागणार आहेत याचा फायदा अनेकांनी घेतला. देडलाईन फेब्रुवारी महिन्याची होती ९  महिन्यात पूर्ण केला यात केडीमसी अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कटाई येथील पुलाचे काम सुरू झाल्यानंतर येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी होणार नाही  असेही शिंदे यांनी सांगितले.

 

     दरम्यान कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम सुरू असल्याने गेल्या ३  वर्षांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडत आनंद व्यक्त केला.

 

 

◆पत्रिपुलाला नाव देण्यावरून शिवसेना भाजपा आमने – सामने


पत्रिपुलाला माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलम यांचे नआव देण्यात यावे याबाबत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. त्याबाबत विचार करावा असे भिवंडी मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांनी उद्घाटन कार्यक्रमात भाषण करतावेळी सूचना केली. या वक्तव्यावर उपस्थित नागरिकांमध्ये कुबुज सुरू झाली. ही सावरण्याकरीता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपूलाचे नाव श्री तिसाई देवी असे देण्यात आले असल्याचे आपल्या भाषणात प्रातिउत्तर दिले. यावरून पत्रीपूलाचे नाव काय द्यावे यावरून शिवसेना भाजप आमने सामने असल्याचे दिसून आले.


 

◆कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांची नाराजगी


महाराष्ट्रात शिवसेना कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस असे महावीकास आघाडीचे सरकार असून स्थानिक शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्याना याचा विसर पडला आहे. कॉँग्रेस पक्षाच्या कोणत्याची नेत्यालापदाधिकारींना आणि कार्यकरतींना पत्रिपुल उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच कार्यक्रमच्या निमंत्रण पत्रिकेत उल्लेख देखील करण्यात आला नव्हता. याउलट महावीकस आघाडी सरकारच्या विरोधात असणाऱ्या व कल्याण डोंबिवली महपालिकेत शिवसेनेच्या विरोधी भूमिकेत असणाऱ्या भाजपला निमंत्रण देण्यात आले. तसेच कार्यक्रमच्या निमंत्रण पत्रिकेतही भाजपा निटयांचा आणि पदाधीकऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे निंतरं न दिल्याने कल्याण डोंबिवली कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पत्राद्वारे आपली नाराजगी व्यक्त केली.

अखेर वाहतुकीसाठी खुला झाला ‘पत्रीपूल’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाईन उदघाटन अखेर वाहतुकीसाठी खुला झाला ‘पत्रीपूल’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाईन उदघाटन Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads