Header AD

बर्ड फ्ल्युने नुकसान ग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या


मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : बर्ड फ्ल्युने नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या अशी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून याबाबतचे पत्र दिले आहे.


कोरोनाच्या महासंकटातून सावरत असताना पोल्ट्री व्यवसायिकांना बर्ड फ्ल्युने घेरले असून सोमवारी मुंबईठाणेपरभणीदापोलीबीडअकोलालातूरगोंदियाचंद्रपूर आदि भागांतील पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु संसर्गाने पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्ल्यु नमुने पॉझिटीव्ह आल्याने राज्यात अलर्ट जाहीर करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रात बर्ड फ्ल्युची भिती पसरून कोंबड्या आणि अंड्याचा भाव पूर्णपणे गडगडला आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चिकण व अंड्याची मागणी नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांकडे पाळलेल्या कोंबड्या नष्ट करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसून पोल्ट्री व्यवसायिक हवालदिल झाले आहेत. बर्ड फ्ल्युमुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायिकांबरोबरच लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे.


 शेतीपूरक सर्वात मोठा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु वर्षभरात कोरोना आणि बर्ड फ्ल्युच्या संकटामुळे व्यवसाय पूर्णपणे आर्थिक डबघाईला आला आहे. शासनाकडून विविध माध्यमातून बर्ड फ्ल्युमुळे चिकण, अंडी खाल्याने कोणताही धोका नसल्याचा प्रचार करण्यात येत असला तरी नागरिकांमध्ये भिती परसल्यामुळे चिकण अंड्यांचा उठाव पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. आधीच कोरोनाच्या संकटातून बाहरे येत असताना आता बर्ड फ्ल्युच्या आस्मानी संकटात सापडलेला कुक्कुटपालन व्यवसायिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. तरी शासनाने तातडीने राज्यातील सर्व पोल्ट्री व्यवसायिकांना सरसकट आर्थिक मदत करुन सहकार्य करावे अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत पत्र दिले आहे.

बर्ड फ्ल्युने नुकसान ग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या बर्ड फ्ल्युने नुकसान ग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads