Header AD

कल्याण तालुक्यातील ग्राम पंचायतीं वर सेना भाजपा दोघां चेही दावे

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील २१ ग्राम पंचायती साठी निवडणूक पार पडली असून या निवडणुकीचा निकाल देखील आज जाहीर झाला आहे. मात्र या ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी आपआपले सरपंच होणार असल्याचे दावे ठोकल्याने सरपंच निवडीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.


       कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या २११ जागा असून यामध्ये ११ सदस्य संख्या असलेली वरप ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती. तसेच इतर ग्रामपंचायतींमध्ये काही सदस्य देखील बिनविरोध आल्याने २११ पैकी ३३ जागांवर बिनविरोध सदस्य निवडून आले होते. यामुळे १६७ जागांसाठी मतदान पार पडले. या मतदानाचा कौल पहाता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणाची सरशी झाली आहे तर कोणाला धक्का बसला आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गाव पातळीवर पॅनल पद्धतीने निवडणुका लढविल्या जातात. गावाचा कारभार हाकण्यासाठी स्थानिक पातळीवर या पॅनलला राजकीय पक्षांचे छुपे पाठबळ असते.


बेहरे ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे राखण्यात यश आले असून दुसरी ग्रामपंचायत म्हारळ त्रिशंकू अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत मनसेने देखील आपले खाते उघडले आहे. कल्याण तालुक्यातील गोवेलीम्हसकळनिंबवलीगुरवलीघोटसईआपटीउतणे चिंचवलीबापसईराया ओझल्री, नडगावसांगोडा या ग्रामपंचायतीवर भाजपा दावा करत असून खडवली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना काँग्रेस आघाडीने सत्ता मिळवली आहे. तर म्हारळ ग्रामपंचायत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. येथे भाजपा ७, शिवसेना ७व इतर ३असे पक्षीय बलाबल आहे.


        औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांबा ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. याच प्रमाणे वडवलीरायतेमानवलीयेथे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे येथे मनसेचे ४,भाजपा २,आणि शिवसेना ५असे पक्षीय बलाबल आहे. तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. असे असले तरी सरपंच पदाची निवड झाल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात राहतात हे चित्र स्पष्ट होईल. 
कल्याण तालुक्यातील ग्राम पंचायतीं वर सेना भाजपा दोघां चेही दावे कल्याण तालुक्यातील ग्राम पंचायतीं वर सेना भाजपा दोघां चेही दावे Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads