Header AD

पैशासाठी अपहरण करून वृद्धाला माळशेज घाटात दरीत फेकले

 

◆दैव्य बलवत्तर म्हणून वाचले प्राण महात्मा फुले पोलिसांनी २४ तासात दोन आरोपींना केली अटक, तर  एक फरार....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पैशासाठी अपहरण करून वृद्धाला माळशेज घाटात दरीत फेकले मात्र  दैव्य बलवत्तर म्हणून त्या वृद्धाचे प्राण वाचले असून याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी २४ तासात दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.


रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले प्रकाश लक्ष्मण भोईर हे कल्याण मधील खडकपाडा येथे राहत असून त्यांनी घर दुरुस्तीचे काम न दिल्याचा राग अनावर होवुन तिघा मित्रांनी त्यांचे अपहरण करीत त्यांना मुरबाड माळशेज घाटात नेऊन त्यांच्या डोक्यात दगड मारून दरीत ढकलून दिल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून भोईर हे जखमी अवस्थेत दरीच्या बाहेर  आले. प्रकाश भोईर हे खडकपाडा कल्याण येथे वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या डागडुगीचे काम शैलेश दत्तात्रय गायकवाड(३५)भरत मच्छिंद्र गायकवाड व प्रदीप वसंत जाधव यांना न दिल्याने हे आरोपी प्रचंड संतापले होते.


सेवानिवृत्त असणारे भोईर यांचे सेवानिवृत्तीचे पैसे हडप करण्याच्या उद्देशाने स्टेट बँक कल्याण येथे आरोपींनी त्यांना बोलावून घेत त्यांना रिक्षात बसवले व अपहरण करीत माळशेज घाटावर उंच व निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन भोईर यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांना दरीत फेकून देण्यात आले. सेवानिवृत्त असलेले भोईर हे मृत पावले असतील या भ्रमात आरोपी होते त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या बनावट चावीने घरात शिरून ७५००० रोख रक्कमतेरा लाख पंचवीस हजार किमतीचे सव्वीस तोळे सोनेएक्टिवा व अन्य वस्तू असे मिळून चौदा लाख पंच्यांणव हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.


ज्येष्ठ नागरिक असलेले भोईर यांना रात्री सातच्या दरम्यान माळशेज घाटातील दरीत फेकले नंतर तब्बल तीन तासांनी ते कसेबसे दरीच्यावर रस्त्यावर येऊन एक ट्रॅक्टरला हात दाखवत मदत मागितली. मग त्यांनी टोकावडे पोलिस स्टेशन गाठून त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर प्राथमिक उपचार करीत त्यांना अधिक उपचारांसाठी कल्याणमधील रेल्वे हॉस्पिटल येथे दाखल केले. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा मागोवा घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच आरोपींचा शोध घेत तिघांपैकी दोघांना अटक केली. २५ जानेवारी रोजी दुपारी अपहरण केल्यानंतर २४ तासात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे.


गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या टीमने तांत्रिक कौशल्याचा वापर करून २४ तासात गुन्हा उघडकीस आणला. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, व.पो.नि. नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर संभाजी जाधव हे अधिक तपास करीत आहेत.


पैशासाठी अपहरण करून वृद्धाला माळशेज घाटात दरीत फेकले पैशासाठी अपहरण करून वृद्धाला माळशेज घाटात दरीत फेकले Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads