Header AD

ब्लॅक मेलिंगच्या प्रकारातून 'त्या' महिलेवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद ..

 


भिवंडी , प्रतिनिधी  :  एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार झाल्याची  घटना १२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. हि काल्हेर घटना  भिवंडी तालुक्यात काल्हेर गावातील जय दुर्गा सोसायटीमध्ये घडली होती. विशेष म्हणजे भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाकडे  कुठलाही सुगावा नसताना अथक प्रयत्नानंतर ३ दिवसातच  महिलेवर गोळीबार  करणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यात यश आले.  धक्कादायक बाब म्हणजे   ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून   ५० हजार रुपये मागणीच्या वादातून आरोपीने घरात घुसून गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आले. सुरेद्र प्रतापसिंह भाटी (वय २४,  रा.धार, मध्यप्रदेश)  आणि मानसिंग उर्फ बंटी सदन चौहाण (वय २०)  असे आरोपीचे नावे असून या दोघांनाही  मध्यप्रदेशमधील  धार शहरातुन ताब्यात घेवुन अटक केली आहे.  तर जयश्री देडे  ( वय ३६ ) असे जखमी महिलेचे नाव असून तिच्यावर अध्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

 

 व्यावसायातून ओळख झाल्याने घडला प्रकार ...  

 

जखमी जयश्री  हि काल्हेर मधील जय दुर्गा सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत. तिच्या  पतीचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून ती देखील पतीचा ट्रान्सपोर्ट व्यावसाय सांभाळत असल्याने यातील आरोपी सुरेंद्र भाटी हाही  भिवंडीत ट्रान्सपोर्टमध्ये काम करीत असताना जयश्री  यांचे पती  शिवराम देडे यांचे सोबत त्याची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेऊन जयश्रीला खोटी बदनामी करण्याच्या नावाने धमकी देत, तिला  ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी आरोपी करीत होता. मात्र ती त्याला ५० हजार देण्यास नकार देत होती. मात्र त्याला पैश्याची गरज असल्याने त्याने साथीदार मानसिंग उर्फ बंटी चौहाण याचेशी आपसात संगणमत गोळीबार केल्याचे समोर आले आहे. 

 

असा रचला होता गोळीबाराचा कट ... 


आरोपी भाटी आणि बंटी  १२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्या महिलेच्या घरात घुसुन  देशी बनावटीचे पिस्टलचा धाक दाखवून  पैशाची मागणी करीत होते. मात्र महिले नकार देऊन आरडाअरोडा केल्याने आरोपी  सुरेद्र भाटी याने  महिलेच्या डोक्यामध्ये गोळी मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी महिलेचा मुलगा व शेजारी राहणार चेतन पवार मदतीसाठी आले असता, आरोपीने त्यांच्या दिशेनेही गोळीबार करून फरार झाले होते. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन मुख्य आरोपी भाटी याचेवर मध्यप्रदेश येथे राजगड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

ब्लॅक मेलिंगच्या प्रकारातून 'त्या' महिलेवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद .. ब्लॅक मेलिंगच्या  प्रकारातून 'त्या' महिलेवर गोळीबार करणारे आरोपी जेरबंद ..   Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads