Header AD

कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

 

■५७,६५० एकूण रुग्ण तर ११०६ जणांचा आता पर्यंत मृत्यू
 तर २४ तासांत १०८ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ८५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०८  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या ८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,६५०  झाली आहे. यामध्ये ९६८  रुग्ण उपचार घेत असून ५५,५७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०, कल्याण प – ३०, डोंबिवली पूर्व –२५, डोंबिवली प – १२, मांडा टिटवाळा -७ तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  २ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८५ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads