ठाणे पोलिसांनी पथनाट्या द्वारे केली कोरोना बाबत जनजागृती
ठाणे , प्रतिनिधी : ठाणे नगर पोलीस ठाणे आणि नौपाडा पोलीस ठाणे यांच्या वतीने रेझींग डे सप्ताहाच्या अनुषंगाने ठाणे शहरात कोरोनाबाबत जनजागृती अभियान राबविले. नाट्य-सिने दिग्दर्शक किरण नाकती यांच्या पुढाकाराने दोन ठिकाणी पथनाट्ये सादर करुन कोरोनाबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली.महाराष्ट्र पोलिसांच्या रेझींग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ठाणे नगर पोलिसांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त अविनाश अंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी अनुक्रमे जांभळी नाका आणि तलावपाली, चिंतामणी चौक येथे पथनाट्याचे आयोजन केले होते.या पथनाट्याचे दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले होते. यावेळी पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment