मनसेच्या कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता गायकवाड
कल्याण, कुणाल म्हात्रे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असून त्यानुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मनसेमध्ये देखील आगामी केडीएमसी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पदनियुक्ती केली जात आहे. माजी नगरसेवक असलेले अनंता गायकवाड यांना पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी म्हणून पालिका प्रशासनाच्या कामाचा अनुभव असून याचा फायदा मनसेला होऊ शकतो.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याला सोपवलेली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडत पक्ष संघटना मजबूत करून आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अनंता गायकवाड यांनी दिली.

Post a Comment