Header AD

भिवंडी महापालिकेच्या १८ नगरसेवकांना नोटीसा, ५ जानेवारी ला हजर राहण्याचे कोकण आयुक्तांनी दिले आदेश..





भिवंडी  , प्रतिनिधी   :  नगरसेवक पद वाचवण्यासाठी भिवंडी महापालिकेचा १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते अशोक भाई जगताप तीव्र नाराज झाले असुन त्यांनी बंडखोरी करणाऱ्या १८ नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केले आहेत. तीन वर्षा पुर्वी महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा  १८ नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला.त्यामुळे १८ फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे  नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे केल्यामुळे या नगरसेवकांना 
काल कार्यालयात बोलावून आयुक्तांनी सुनावणी व्दारे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व कागदपत्राची तपासणी पूर्तता करून ५ जानेवारी रोजी हजर रहावे असे आदेश नगरसेवकांना कोकण आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी दिल्यामुळे नगरसेवकांचा गटात खळबळ उडाली आहे.


पालिकेचा महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा १८ नगरसेवकांनी पक्षा आदेश झुगारून  कोणार्क विकास आघाडीच्या  महापौर पदाचा उमेदवारास मतदान केले.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका प्रदिप राका  पराभव झाला.त्यामुळे काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या १८ नगरसेवकांचे नगरसेवक पद  रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे पालिकेचे नगरसेवक  जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त आयुक्त यांच्या  केली त्यामुळे १८ नगरसेवकांना नोटीस बजावली होती.त्यामुळे  पालिकेचे नगरसेवक १८ पैकी ५ नगरसेवक कोकण विभाग कार्यालयात हजर झाले होते. त्यांचे मत  कोकण आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी ऐकून नोंदवून घेतले चारशिट केली. कागदपत्रे तपासणी वेळ हवा आहे. अशी मागणी वकीलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकुन घेत सदर नगरसेवकांना ५ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत
भिवंडी महापालिकेच्या १८ नगरसेवकांना नोटीसा, ५ जानेवारी ला हजर राहण्याचे कोकण आयुक्तांनी दिले आदेश.. भिवंडी महापालिकेच्या १८ नगरसेवकांना नोटीसा, ५ जानेवारी ला हजर राहण्याचे कोकण आयुक्तांनी दिले आदेश.. Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले

मुंबई, १८ जानेवारी २०२१ :  मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या ...

Post AD

home ads