Header AD

अ" प्रभाग क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाई अनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट

                            



कल्याण ,  कुणाल  म्हात्रे   :  "अ" प्रभाग क्षेत्रातील बल्याणी मोहने,  परिसरातील अनाधिकृत रूम् अनाधिकृत दुकानाचे गाळे, अनाधिकृत जोत्या वर " अ "प्रभागक्षेत्र आधिकारी  सुधीर मोकल यांच्या पथकाने धडक कारवाईचा बडगा उचलित हातोडा चालवित  अनाधिकृत बांधकामे भुईसपाट केली।.    
                                                                                       
अ" प्रभागातील बल्याणी येथील रेल्वे रेल्वे लाईन नजीक  परिसरातील  ५ अनाधिकृत रूम ,  तसेच  १२अनाधिकृत  जोते,  मोहने एन् आर् सी गेट परिसरातील २अनाधिकृत दुकाने ,अशा  अनाधिकृत  बांधकामावर   प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित  अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.


        या कारवाईसाठी  १ जे.सी.बी. , तसेच  अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, असा फौज फाटा होता.    आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप   यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

अ" प्रभाग क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाई अनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट अ" प्रभाग क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामावर मनपाची धडक कारवाई अनाधिकृत बांधकामे केली भुईसपाट  Reviewed by News1 Marathi on January 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

  डोंबिवली ( शंकर जाधव ) वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर  यांच्या आदेशाने दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकारी आंदोलनाला पाठ...

Post AD

home ads