Header AD

नायलॉन मांज्यामुळे खंड्या पक्षी जखमी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पतंग उडवताना वापरला जाणारा नायलॉनचा मांज्या हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतत आहे. अशाच प्रकारे नायलॉनच्या मांज्यामुळे एक खंड्या (किंगफिशर) पक्षी जखमी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा, लक्ष्मी नारायण कॉलोनी येथे घडली आहे. येथील रहिवासी विजय मनियार यांना हा खंड्या पक्षी जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्यांनी पक्षी मित्र महेश बनकर यांना फोन करत याबद्दल माहिती दिली. 


बनकर यांनी तात्काळ त्याठिकाणी जात त्या पक्ष्याला औषध उपचारासाठी आपल्या घरी आणले. पतंगाच्या नायलॉन मांजामुळे त्याच्या पंखांना इजा झाली असून त्याच्यावर उपचार झाल्यावर त्याला  सोडून देणार असल्याचे पक्षी मित्र महेश बनकर यांनी सांगितले.

नायलॉन मांज्यामुळे खंड्या पक्षी जखमी नायलॉन मांज्यामुळे खंड्या पक्षी जखमी Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

गरिबीचे नाटक करून लग्न करून ती करायची नवाऱ्यांची फसवणूक , भिवंडीत झाला प्रकार उघड

■फसवणूक करणाऱ्या तीन महिलांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.... भिवंडी दि. १५ (प्रतिनिधी  )  फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमी...

Post AD

home ads