Header AD

शाळेच्या फीमध्ये कपात करण्यासाठी मनसेचा हॉली एंजल्स शाळेवर भव्य मोर्चा...
डोंबिवली , शंकर जाधव  : लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर व्यवसाय ठप्प झाले.पोटाची खळगी भरणार कशी अशी चिंता सतावित असताना शाळेची फी भरण्यास अडचण येते. अश्या वेळी शाळेने फी मध्ये कपात करावी अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.शाळा व्यवस्थापन या मागणीचा विचार करत नसल्याने पालकांनी अखेर मनसेकडे आपली व्यस्था मांडली.या मागणीसाठी डोंबिवली पूर्वेकडील हॉली एंजल्स शाळेवर शनिवारी मनसेने भव्य मोर्चा काढला. या मोर्च्यात पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.लोकशाही मार्गाने मनसेचे मोर्चा काढला होता. परंतु मोर्चेकऱ्यांना उत्तर देण्यास शाळा व्यवस्थापन समोर आले नाही.त्यामुळे मनसैनिक आणि पालकवर्ग संतापले होते.शांतपणे चर्चा करण्यास शाळा व्यवस्थापन तयार नसेल तर येत्या दहा दिवसात मनसे स्टाईलने मोर्चा काढू असा इशारा मनसेने dinदिला.


मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत याच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पूर्वेकडील पीएनटी कॉलिनी येथील हॉली एंजल्स शाळेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे,महिला पादाधिकारी मंदा पाटील,मिलिंद म्हात्रे. माजी नगरसेविका कोमल पाटील,सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील, सपना पाटील,अरुण जांभळे,संदीप ( रमा ) म्हात्रे, गणेश कदम,प्रीतेश प्रीतेश म्हामुणकर,शर्मिला लोंढे, शीतल लोके, आदीसह मनसैनिक उपस्थित होते.पीएनटी कॉलिनी येथून मोर्च्याला सुरुवात झाली. हॉली एंजल्स शाळेपर्यत मोर्चा आल्यावर मोर्चेकरांना शाळेत प्रवेश करण्यास पोलिसांनी अडवले.


कायदा हातात घ्यायचा नाही या अटीवर काही मनसैनिक आणि मोजकेच पालकवर्ग यांना शाळेच्या आत जाण्यास परवागनी देण्यात आली.परंतु शाळेत गेल्यावर शाळा व्यवस्थापनाकडून कोणीही बोलण्यास तयार नव्हते.फक्त शाळेतील एक कर्मचारी समोर आल्याने मनसैनिक आणि पालकवर्ग संतापले.शाळा व्यवस्थापनाला आमच्याशी बोलण्यास वेळ नसेल तर येत्या दहा दिवसात शाळेवर मनसे स्टाईलने मोर्चा काढू असा इशारा दिला.त्यानंतर शाळेबाहेर उभे असलेल्या पालकांना मनसैनिकांनी शाळेच्या अश्या वागणुकीची माहिती दिली. त्यामुळे पालकवर्गानी हॉली एंजल्स शाळेविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शालेबाहेत वातावरण दणाणून सोडले.मनसेची साथ मिळाल्याने उपस्थित पालकवर्गांनी `महाराष्ट नवनिर्माण सेनेचा विजय असो` अश्या घोषणा दिल्या.


याबाबत हॉली एंजल्स शाळेचे संचालक ओमेन डेविड यांना संपर्क साधला असता ते म्हणाले,विना अनुदानित शाळांची दुर्दशा लक्षात घेऊन आमच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या महिन्याच्या अंतिम सुनावणीत  आणि निकालासाठी हे प्रकरण समोर येत आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आधीच सुरु आहे.या महिन्याच्या अखेरीस निर्णय अपेक्षित आहे.फी मध्ये सवलत देण्याचा कोणताही निर्णय  त्यानंतरच घेतला जाईल. निकाल लागल्यानंतर आम्ही त्यावर नक्कीच विचार करू. आम्हीदेखील पालकांसाठी फी मध्ये काही कपात करण्याचा विचार करत आहोत. परिस्थिती लक्षात घेता आम्ही एकदा न्यायालयाचा निर्णय आला कि फी मधील सावलतीसाठी पालकांच्या विनंतीवर विचार करू.

शाळेच्या फीमध्ये कपात करण्यासाठी मनसेचा हॉली एंजल्स शाळेवर भव्य मोर्चा... शाळेच्या फीमध्ये कपात करण्यासाठी मनसेचा हॉली एंजल्स शाळेवर भव्य मोर्चा... Reviewed by News1 Marathi on January 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads