Header AD

भिवंडीत मल उद्दचन केंद्र बनविण्यास स्थानिकांचा विरोध रस्त्यावर उतरून आंदोलन...
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  मानसरोवर परिसरात बनविण्यात येत असलेल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट [ STP ] हा निवासी वस्तीत असल्याने त्यास विरोध होत  असून त्या विरोधात मानसरोवर फुले नगर येथील नागरीकांनी
रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करीत आपला विरोध दर्शविला आहे .भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून रखडलेली भुयारी गटर योजनेची मल निस्सारण योजने चे काम आज ही अर्धवट असल्याने पूर्णत्वास जात नाही त्यातच या योजने अंतर्गत ठिकठिकाणी बनविण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट [ STP ] यास ही नागरिकांचा विरोध वाढत आहे.


शहरातील  कामतघर ताडाळी मानसरोवर फुले नगर या भागातील भुयारी गटार या मानसरोवर फुलेनगर येथील महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखं डावर बनविण्यात येणाऱ्या मल उद्दचन केंद्र या ठिकाणी जोडण्यात येणार असून तेथून प्रक्रिया होऊन पाणी पुढे खाडीस सोडले जाणार आहे .हा संपूर्ण परिसर नागरी वस्तीचा असल्याने हे केंद्र या भागात बनविण्यास मानसरोवर ,फुले नगर येथील नागरिकांचा विरोध असून त्या विरोधात विनंती अर्ज ,तक्रारी दाखल करून ही महानगरपालिका प्रशासन येथील प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद करीत नसल्याने मानसरोवर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशी स्त्री पुरुष नागरीकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे .भर नागरी वस्तीत बनविण्यात येणाऱ्या या मल उद्दचन केंद्रा मुळे स्थानिक रहिवाश्यांना दुर्गंधीचा सामना अहोरात्र करावा लागणार असून येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी तक्रार स्थानिक नागरीक व महानगरपालिका सभागृह नेते शाम अग्रवाल यांनी केली आहे.या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मोर्चा काढण्यास मनाई केल्याने मोठा पोलीस फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला होता .त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी मानसरोवर प्रवेशद्वारा बाहेर एकत्रित होत महानगर पालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .
भिवंडीत मल उद्दचन केंद्र बनविण्यास स्थानिकांचा विरोध रस्त्यावर उतरून आंदोलन... भिवंडीत मल उद्दचन केंद्र बनविण्यास स्थानिकांचा विरोध रस्त्यावर उतरून आंदोलन... Reviewed by News1 Marathi on January 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads