सावित्रीमाई फुले जयंती निमित्त राष्ट्रवादीने केला शिक्षिकांचा गौरव
ठाणे , प्रतिनिधी : आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ज्ञानदानाचे कार्य करणार्या महिला शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहराध्यक्ष सुजाताताई घाग आणि ॠताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीमाई यांची जयंती पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीमाईंनी सुरू केलेले शिक्षणाचे कार्य सुरू ठेवणार्या वसुंधरा वायदंडे, वैशाली शिवाजी पवार, अजिता कुमठेकर, भारती पुरोहित, तनया रावराणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, महिला तसेच युवती पदाधिकारी पूनम वालिया, शशिकला पुजारी, स्मिता पारकर, ज्योती निंबरगी, माधुरी सोनार, सुरेखा शिंदे, वंदना लांडगे, संगिता चंद्रवंशी, शुभांगी कोळपकर, वंदना हुंडारे, सुवर्णा खिल्लारे, स्नेहल चव्हाण, गायत्री आर्यमणी, कुंदा निगोट, पल्लवी गिध, साबिया मेमन, कल्पना नार्वेकर, गीता शिंदे, संगीता पुरोहित, अजिता कुमठेकर, भारती पुरोहित, गीता कट्टे, सुजाता चव्हाण, शर्मिली पारकर, अमृता मिसाळ, संगीता शेळके, रेश्मा पावडे, प्रतिभा पुर्णेकर, पूजा खान, पूजा शिंदे, पूजा दामले, अपर्णा पाटील, सुरेखा शिंदे, निलम गायकवाड, रंजिता गुळेकर, अश्विनी सावंत, नलिनी सोनावणे, भानुमती पाटील, ज्योती चव्हाण, तबस्सुम तांबोळी, रुबिना शेख, रुबीना सय्यद, वनीता भोर, शैलजा पवार, माया केसरकर तसेच शहर अध्यक्ष आनंद परांजपे, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, महेंद्र पवार, सरचिटणीस रविंद्र पालव, सामाजिक सेल चे अध्यक्ष कैलास हावळे आदी उपस्थित होते

Post a Comment