Header AD

अर्णव गोस्वामीच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करीत भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
भिवंडी , प्रतिनिधी  :  टीआरपी घोटाळा व त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुंतल्याने चर्चेत असलेले आर भारत न्यूज चॅनल चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या पुलवामा हल्ल्या संदर्भातील सोशल मीडिया वरील चॅट जगा समोर आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना त्या विरोधात विरोधकांनी सर्वत्र अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत.


भिवंडी शहरात कॉंग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अर्णव गोस्वामी विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत अर्णव गोस्वामी यांच्या पोस्टर ला जोडे मारत निदर्शने केली व त्या नंतर अर्णव गोस्वामी यांचे फोटो असलेले पोस्टर जाळून आपला संताप व्यक्त केला आहे .या आंदोलनात शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन ,तारिक फारुखी ,सोहेल खान ,ताज अन्सारी ,फजले खान ,अशोक पाटील, रुकसाना कुरेशी,नगरसेवक सिराज मोमीन,परवेज मोमीन,शकील पापा,अश्रफ मुन्ना ,डॉ जुबेर अन्सारी ,साजिद अन्सारी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अर्णव गोस्वामीच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करीत भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने अर्णव गोस्वामीच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करीत भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads