सर्प मैत्रीणीने दिले धूळ 'नागीण'सह चटया बट्ट्याच्या कवड्या सापाला जीवदान
कल्याण , कुणाल म्हात्रे : हवामानातील बदलावामुळे व भक्ष्य शोधण्यासाठी विषारी, बिन साप मानवीवस्तीत शिरल्याच्या गेल्या २० दिवसात अनेक घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील शहाड परिसरातील एका घरातील गॅलरीत चटयाबट्ट्याच्या कवड्या जातीचा साप तर बांधकाम सुरु असलेल्या एका साईटवर नागा सारखा साप दिसल्याने येथील मजुरांची पळापळ झाली होती. या दोन्ही सापांना सर्पमैत्रिणीने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे. तर साप एका घराच्या बाथरूम दडून बसला होता, याही सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे.
कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकाम ठिकाणी काल सकाळच्या सुमारास नागा सारखा दिसणारा साप या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना दिसल्याने काम बंद करून त्यांची पळापळ झाली होती. त्यांनतर साईट सुपरवाजझर यांनी नागिणीची माहिती सर्पमित्र दत्ता बोबें यांना दिली असता सर्पमित्र दत्ता आणि सिद्दी गुप्ता ही सर्पमैत्रीण घटनास्थळी पोहचून या नागिणीला पकडून पिशवीत बंद केल्याने मजुरांनी सुटकेचा निश्वास घेतला.
दुसऱ्या घटनेत शहाड परिसरात राहणाऱ्या शोभा मन्नाडे यांच्या घरातील गॅलरीत काल सायंकाळच्या सुमारास लांबलचक चटयाबट्ट्याचा साप शिरला होता. मन्नाडे यांच्या पत्नी गॅलरीत कामानिमित्य केल्या असता त्यांना लांबलचक चटयाबट्ट्याचा साप आढळून आल्याने त्यांनी घराबाहेर पळ काढून पतीला घरात साप शिरल्याची माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र दत्ता बोबे, यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता आणि सर्पमैत्रीण सिद्दी गुप्ता दोघेही काही वेळातच घटनास्थळी येऊन या सापाला सिद्दीने शिताफीने पकडले, हा साप साडेचार फूट लांबीचा असून कवड्या जातीचा आहे.

Post a Comment