Header AD

भिवंडीत सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नवभारत इंग्लिश स्कुलच्या स्मरणि केचे प्रकाशन संपन्न
भिवंडी , प्रतिनिधी   :  भिवंडी शहरात फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण न देता सुसंस्कारी पिढी घडविण्यात योगदान देणाऱ्या नवभारत एज्युकेशन सोसायटी संचालित नवभारत इंग्रजी स्कुल ने नुकताच ५० वर्ष पूर्ण केले असून या सुवर्ण महोत्सवा निमित्त नुकताच एका विशेष कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन संस्थाध्यक्ष कमलकिशोर हेडा यांच्या शुभहस्ते उपाध्यक्ष डॉ विवेक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


           या सुवर्ण महोत्सवी शैक्षणिक वर्षात अनेक समाजोपयोगी उपक्रम शाळेच्या माध्यमातून करण्यात आले परंतु कोरोना संक्रमण कालावधीत स्मरणिका प्रकाशन विलंबाने करण्यात आल्या बद्दल संस्थाध्यक्ष कामालकिशोर हेडा यांनी दिलगिरी व्यक्त करीत शहरातील शिक्षणप्रेमी नागरीक ,शाळेवर विश्वास ठेवणारे पालक व विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना सोबत संस्कारांचे शिक्षण देणारे शिक्षक या सर्वांच्या सहजाऱ्यारून शाळेने पन्नास वर्षांची वाटचाल केली असून भविष्यात सुध्दा या शाळेचा नावलौकिक सर्वत्र राहील असा विश्वास शेवटी कमलकिशोर हेडा यांनी व्यक्त केला .


          या कार्यक्रम प्रसंगी व्यवस्थापन समिती सदस्य 
पुरुषोत्तमदास पटेल, राहुल जोशी,विनोद शेटे,प्रशांत अस्वले,गीतांजली आंबवणे,आजीमाजी शिक्षक ,स्मरणिकेस जाहिरात देणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय कालगावकर यांनी तर आभार प्रदर्शन अनिल निकते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुज्योती वल्लाळ यांनी केले .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्मरणिका प्रकाशन समिती चे सूर्यकांत बल्लेवार व इतर सर्व शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली.
भिवंडीत सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नवभारत इंग्लिश स्कुलच्या स्मरणि केचे प्रकाशन संपन्न भिवंडीत सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नवभारत इंग्लिश स्कुलच्या स्मरणि केचे प्रकाशन संपन्न Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads