Header AD

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार ?





कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच कल्याण ग्रामीणमधील आणे-भिसोळ ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या ग्रामपंचायतीच्या वेशीवर असणाऱ्या वाघेरापाडा स्मशानभूमीत  निवडणूकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची हाताने नावे लिहिलेला कागद कणकेच्या गोळ्यात खोचलेला आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असुन खमंग चर्चा यानिमित्ताने रगंल्या आहेत.


ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ ग्रामपंचायतीसाठीही आज मतदान झाले. त्याचदरम्यान आणे-भिसोळ आणि वाघेरा पाडा गावांच्या वेशीवर असणाऱ्या वाघेरा पाडा स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघेरा पाडा गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक ग्रामस्थ स्मशानभूमीत आले. त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. स्मशानभूमीत चितेशेजारी एका कणकेच्या गोळ्यामध्ये उमेदवारांची नावं असलेला हा कागद खोचण्यात आला होता.


या प्रकारामुळे निवडणूक आणि जादूटोण्याचे प्रयोग याची उलट सुलट चर्चा रंगली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात   अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत झाला असला तरी अशा घटना समोर येत असल्याने अंधश्रद्धेची पाळेमुळे कधी नष्ट होणार असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.


कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार ? कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार ? Reviewed by News1 Marathi on January 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कंपनीच्या आवारातच केमिकल सांड पाण्यावर मायक्रो ऑर्गनिझम टेक्नोलॉजीचा प्रयोग पुणे,औरगाबाद नंतर डोंबिवलीत

डोंबिवली (शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसी मधील जवळपास ९० टक्के कारखान्या मध्ये केमिकल मिश्रित सांडपाणी हे सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यत वाहून ...

Post AD

home ads