सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान
कल्याण , कुणाल म्हात्रे : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था,कल्याण आणि सिध्दार्थ विद्या मंदिर कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा संघटक संगीता रामटेके, सहा.जिल्हा आयुक्त जगन्नाथ सपकाळे, डोंबिवली स्थानिक संस्थेचे सचिव जगदीश उगले, संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, उपाध्यक्षा तथा मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे, सचिव दिलीप तडवी, सहसचिव निवेदिता कोराने, कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सिध्दार्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना चाळसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध विभागात कार्यरत असणा-या दोन महिलांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात विविध प्रकारचे सर्वेक्षण करणा-या नेतिवली आरोग्य केंद्रातील इंताज शेख व वाहतूक उपशाखा कोळसेवाडी येथील पोलिस कॉन्स्टेबल सोनम मोजाड यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रूमाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुनिल उगले यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट अतिशय समर्पक शब्दात सर्वांसमोर मांडला. तसेच सत्कारमुर्ती सोनम मोजाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महिलांसाठी असणारे महत्व विषद केले. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांचा गुलाबपुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप तडवी यांनी केले, सूत्रसंचालन प्रविण खाडे यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी मानले. याप्रसंगी ट्रेनिंग कौन्सिलर दशरथ आगवणे, निता जाधव, सविता घरत त्याचबरोबर सिध्दार्थ विद्या मंदिरचे निता उगले, शर्मिला साळुंके, सुनिता वंजारी, प्रतिमा तळपे, रूपाली सोनवणे, ज्ञानेश्वर हरड, अशोक काठे, जितेंद्र कुळथे आणि मंगला पवार आदीजण उपस्थित होते. कोरोनामुळे मोजक्याच उपस्थितांमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Post a Comment