Header AD

डोंबिवली पक्षी अभयारण्य`वाचविण्या साठी उंबर्ली टेकडीवर निसर्ग प्रेमींची शासना विरोधात निदर्शने
डोंबिवली , शंकर जाधव : म्हाडा हटवा, टेकडी वाचवा... डोंबिवलीचा श्वास हिरावून घेऊ नका...पर्यावरणाचे रक्षण करा...अशी घोषणा देत डोंबिवलीजवळील उंबर्ली टेकडीवरील बुधवारी सकाळी डोंबिवली पक्षी अभयारण्यात निसर्गप्रेमींनी शासना विरोधात निदर्शने केली.यावेळी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यासह निसर्गप्रेमी राजेश कदम, बंडू पाटील, सारिका चव्हाण,मंगेश कोयंडे,महेश निंबाळकर, समीर भोईर, जगदीश ठाकूर,राजेंद्र नांदोस्कर, मुकेश पाटील, डॉ.नंदा,गायत्री ओक व अनेक निसर्गप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते.निदर्शनानंतर म्हाडा प्रकल्प अधिकारी सुधीर भारांडे, वनविभागाचे अधिकारी कल्पना वाघेरे व आमदार पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.`माझी वसुंधरा`हा उपक्रम शासनाच्या वतीने राज्यात राबविला जात आहे.मात्र दुसरीकडे वनविभागाच्या जमिनीवर म्हाडा सारखे प्रकल्प उभारले जात असल्याने शासन `पर्यावरण रक्षण` हे फक्त दाखवायचे आहे, प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही असा जाहीर आरोप निसर्गप्रेमींनी निदर्शने करताना केला. आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले, पूर्णपणे उंबर्ली टेकडीवर म्हाडाचे प्रकल्प राबविले जाणार नाही.सर्वे नंबर १६२ वर म्हाडाला शासनाने दिला आहे.त्याबाहेर काम जाणार नाही.तर उंबर्ली टेकडीवर अधिकारी कल्पना वाघेरे म्हणाल्या, वनविभागाला नागरिकांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले पाहिजे.संगनमताने जी चर्चा होईल त्यावर मार्ग निघेल.आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले. म्हाडा प्रकल्प उंबर्ली टेकडीवर अतिक्रमण करत असल्याचे निस्र्गप्रेमिनी केला आहे.त्यामुळे आज या टेकडीवर निसर्गप्रेमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.शासने पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.तर निसर्गप्रेमी राजेश कदम म्हणाले,`माझी वसुंधरा` हा नवीन उपक्रम शासनाच्या तीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविला जात आहे. पण दुसरीकडे मात्र पर्यावरणाच्या विरोधात जाऊन वन विभगाच्या जागेवर शासनाने म्हाडा प्रकल्प राबविला.याचा निसर्ग प्रेमींनी एकत्र येऊन निषेध केला. डोंबिवलीतील एकमेव उंबार्ली टेकडीवर अभयारण्य हा डोंबिवलीकरांसाठी मोकळा श्वास आहे. मात्र शासन हा श्वास हिरावून घेत असल्याचा आरोप  निसर्ग प्रेमींनी यावेळी केला.आम्ही सर्वजण उंबर्ली टेकडीवर निसर्ग एकत्र जमून म्हाडा प्रकल्पाविरोधात निदर्शने केली.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणीहि कदम यांनी केली. तर या निदर्शनात बालकाकांपासून ते ज्येष्ठ नागरीक हे या निदर्शनात सहभागी झाले होते. हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून निसर्ग वाचविण्यासाठी केलेल्या या प्रयत्नातून शासन लवकर जागे झाले नाही तर लाखोंच्या संख्येने निसर्ग प्रेमी टेकडीवर एकत्र येऊन जनांदोलन करू असा इशारा निसर्गप्रेमींनी दिला.

डोंबिवली पक्षी अभयारण्य`वाचविण्या साठी उंबर्ली टेकडीवर निसर्ग प्रेमींची शासना विरोधात निदर्शने डोंबिवली पक्षी अभयारण्य`वाचविण्या साठी उंबर्ली टेकडीवर निसर्ग प्रेमींची शासना विरोधात निदर्शने Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads