Header AD

भिवंडीत हॉटेल मालकांचे ग्राहकांवर चाकूने अनेक वार; ग्राहक गंभीर
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  नाष्टाच्या बिलावरून हॉटेल मालक असलेल्या दोघा सख्या भावांनी दोन  ग्राहकांवर चाकूने सपासप वार  करून त्यांना गंभीर जखमी केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना भिवंडी शहरातील गौबीनगर परिसरात असलेल्या हॉटेल बरकातीमध्ये घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोर हॉटेल मालकांवर ग्राहकांना जीवे ठार मारण्याचा  प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघा मालकांना  अटक केली आहे. 


हाफिज उर्फ मोहम्मद जुबेर आबिद अन्सारी (वय,४१) आणि मोहम्मद असाद  जुबेर आबिद अन्सारी असे अटक केलेल्या हल्लेखोर हॉटेल मालकांचे नाव आहे. तर जावेद अब्दुल अजीज शेख (वय २४ रा. गुलजारनगर ) अलीम उर्फ पापा चौधरी (वय ३२) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ग्राहकांची नावे आहेत. 

 

वादात  मध्यस्थी केल्याच्या रागातून चाकू हल्ला ...


हॉटेल मालकांनी चाकू हल्ला करण्यापूर्वी जखमी  ग्राहक  अलीम उर्फ पापा याच्याशी  किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी गंभीर जखमी असलेला जावेद याने मध्यस्थी केली होती. त्यांनतर काही वेळाने पुन्हा बरकाती हॉटेलमध्ये  नाष्टा करण्यासाठी  आले. नाष्टा करून झाल्यावर हॉटेलच्या गल्ल्यावर बिल देण्यासाठी गेले असता, आरोपी हॉटेल मालकांनी पुन्हा बिलावरून वाद घालत आदी वाद सोडविणाऱ्या जावेदवर अचानक धारदार चाकूने सपासप वर केले. 


हे पाहून  त्याच्यासोबत असलेल्या  अलीम उर्फ पापा याने त्याला वाचविण्यासाठी गेले असता, त्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जावेद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर  अलीम उर्फ पापा याच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही वेळातच दोघाही हॉटेल मालकांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले करीत आहेत.


भिवंडीत हॉटेल मालकांचे ग्राहकांवर चाकूने अनेक वार; ग्राहक गंभीर भिवंडीत हॉटेल मालकांचे  ग्राहकांवर चाकूने अनेक वार; ग्राहक गंभीर Reviewed by News1 Marathi on January 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads