आरएसपी युनिट कल्याण तर्फे आदिवासी मुलांना दप्तर वाटप
कल्याण , कुणाल म्हात्रे : वाडा तालुक्यातील शिंगडापाडा येथे टिग्ना रबर कंपनीच्या सहकार्याने आरएसपी युनिट कल्याण-डोंबिवलीच्या मार्गदर्शनाखाली शिंगडापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. आरएसपीचे कमांडर मनीलाल शिंपी यांच्या हस्ते गरीब मुलांना दप्तर व रोजंदारी काम करणारे गरजू १०० ते १५० मजुरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्याम सोनवणे यांच्या उपस्थितीत आरएसपी अधिकारी योगेश आहिरे, दत्तात्रय सोनवणे, समाजसेवक प्रभाशंकर शुक्ला उपस्थित होते. अध्यापक सरगार यांनी शाळेतर्फे व ग्रामस्थांतर्फे कंपनीचे आणि अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment