इंधन दरवाढी विरोधात रस्ता रोको आंदोलन करून राष्ट्रवादीचा भाजप सरकारचा जाहीर निषेध..
डोंबिवली , शंकर जाधव : देशात मोदी सरकार आल्यापासून देशाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. इंधनदरवाढ वाढण्याने सर्वसामान्य नागीकांचे कंबरडे मोडले. हे सरकार जनतेचा किंचितही विचार करत नाही.मोदी सरकारला याचा जाब विचारत इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने डोंबिवली पूर्वेकडील टाटा पाॅवर येथे रस्ता रोको आंदोलन करून भाजप सरकारचा जाहीर निषेध केला.यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रस्ता रोको केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील,माजी गटनेते उमेश बोरगावकर,महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड,समीर भोईर,स्वप्नील रोकडे,सुभाष गायकवाड,प्रशांत माळी,वैभव मोरे,भावेश सोनावणे, कल्पेश अहिरे,गिरीश पाटील,गणेश भोईर,उमेश सहाणे,प्रशांत नगरकर,सुनील बोरनाक,राहुल पाखले,मोहम्मद खान,दत्ता भोईर,शरद म्हात्रे,आफताब खान,गुरु कडव,योगेश माळी,विश्वास आव्हाड,प्रसाद गायकवाड,सुरेय्या पटेल,उज्वला भोसले,मीनाक्षी आहेर,सुलोचना पाटणेकर,बबिता राम,आज्या आवारे,संगीता मोरे,चारुशीला पाटील,वल्ली राजन,भाऊ पाटील,राजेंद्र नांदोस्कर, अशोक बोडके, ब्रम्हा माळी,विलास येवले,प्रकाश हरड,आबिद शेखगिरीश लाडकर आदि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील टाटा पाॅवर येथे रस्ता रोको करून मोदीसरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर यावेळी आंदोलनकर्त्यांनी अप्पर मंडळ अधिकाऱ्याला निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले, केंद्रात भाजप सरकार आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे हाल सुरु झाले. जीवनाश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका वर्षापूर्वी वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार असल्याचे सांगत आंदोलन केले होते.आता पुन्हा आंदोलन करून जनतेचे काय हाल होत आहे या सरकारला दाखवत आहोत.अश्या प्रकारचे आंदोलन सुरु राहतील.एव्हिएम मशीन हटवली तर जनतेला भाजपा त्यांची जागा दाखवून देईल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment