कल्याण मधील एम. जी. क्रिकेट क्लबची बंगळुरु मध्ये शानदार खेळी
बंगळुरु : कल्याण, जिल्हा ठाणे (महाराष्ट्र) मधील एम.जी.स्पोर्ट्स क्लब आणि बंगळुरु मधील वल्चर स्पोर्ट्स क्लब यांच्यात तीन दिवशीय क्रिकेट शृंखला नुकतीच बंगळुरु मधील वी.के.सी.ए.पॅव्हेलियन येथे खेळण्यात आली.यावेळी एम.जी.चा संघाचा कर्णधार साहिल कोचरेकर व तोहीद कुरेशी, श्रेयस जाधव यांनी शानदार फलंदाजी करून उत्तम खेळी खेळली तसेच स्वरित मेश्राम याने जोरदार गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाचे अनेक फलंदाज गारद केले.
रितेश झुंगरे, जयेश लांघी, सुजल पावशे यांनी गोलंदाजी व उत्तम क्षेत्ररक्षण करून प्रतिस्पर्धी संघाला रोखले, तर कर्णधार साहिल कोचरेकर याने अंतिम सामन्यात 20 धावा काढून व 1बळी घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवले. त्याकरिता कर्णधार साहिल कोचरेकर यांस हिरो ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले व जर्सी व कॅप देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment