Header AD

पोलीस उपमहा निरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते मनीलाल शिंपी यांचा देवदूत म्हणून सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण (आर एस पी) अधिकारी यांनी कोविड आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभाग व प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त सह समाजसेवा करण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनीलाल शिंपी कल्याण ठाणे जिल्हा समादेशक, सोमनाथ बोंतले अहमदनगर जिल्हा समादेशक, जालिंदर झिंजाड पुणे जिल्हा समादेशक, सिकंदर शेख अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष, राजेंद्र देशमुख उपसमादेशक अहमदनगर  यांचा महाराष्ट्र राज्य आरएसपीचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या उपस्थितीत प्रतापराव दिघावकर साहेब पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या हस्ते देवदूत या सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी आरएसपी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिघावकर यांनी आरएसपीचे महागुरू अरविंद देशमुख यांचे अभिनंदन केले. कल्याण-डोंबिवली, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, सांगली, सातारा येथील आरएसपी अधिकारी शिक्षकांनी जे कार्य केले केले आहे ते पोलीस विभागाला आणि प्रशासनाला खूप मोलाचे ठरले आहे. एक रुपया ही न घेता शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणिकपणे बंदोबस्त करताना गरजू आणि उपासमारीने झालेल्या नागरिकांना तसेच अडचणीत असलेल्या लोकांना अन्नदान रेशन वाटप औषध आणून देणे घरापर्यंत किराणामाल पोचवणे अशी कामं केली ही म्हणजे खूप मोलाची सेवा आहे. भविष्यात आरएसपी जी मदत लागेल ती करण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे असे सांगितले.


यावेळी रामदास भोकनळ, मुख्याध्यापक कैलास कानवडे, शिवाजी सावंत, अनंत किनगे, जितेंद्र सोनवणे, अनुराधा माने यांच्यासह प्रमुख आर एस पी अधिकारी शिक्षक उपस्थित होते.

पोलीस उपमहा निरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते मनीलाल शिंपी यांचा देवदूत म्हणून सन्मान पोलीस उपमहा निरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते मनीलाल शिंपी यांचा देवदूत म्हणून सन्मान Reviewed by News1 Marathi on January 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads