Header AD

कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

  

◆५९,८८२ एकूण रुग्ण तर ११३५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


  

       आजच्या या ९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,८८२ झाली आहे. यामध्ये ७५६ रुग्ण उपचार घेत असून ५७,९९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २१कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व – २७डोंबिवली प – १०मांडा टिटवाळा – १ तर मोहने येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

 

 

    डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत ९६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ९६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू  Reviewed by News1 Marathi on January 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads