Header AD

भिवंडीत वळ आलिमघर ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध
भिवंडी , प्रतिनिधी  : भिवंडी तालुक्यातील होत असलेल्या ५६ ग्रामपंचायती पैकी वळ आलिमघर ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध केल्या असून ग्रामस्थांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे कौटुंबिक हेवेदावे,शह काट शहा चे राजकारण सर्वत्र दिसत असताना गावात विविध राजकीय पक्षाला मानणारे असले तरी गावाच्या एकी साठी सर्वांनी आपल्या राजकीय पतप्रतिष्ठा बाजूला ठेवून गावात एकोपा नांदावा यासाठी गावातील देवळात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्या बाबत एकमत होऊन गावातील ग्रामस्थांनी त्यास एकमुखी पाठिंबा देत गाव कमिटीने ठरविलेल्या सदस्यां च्या नावा वर शिक्कामोर्तब करीत इतरणाचे उमेदवारी अर्ज माघारी घेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे.          वळ गावातील ग्रामस्थ कमिटीचे सदस्य वसंत भोईर ,हरिश्चंद्र भोईर,रामदास भोईर ,राजू पाटील, अनंता भामरे ,रामदास पाटील ,नाना मढवी ,श्रीराम भोईर, जगदीश पाटील ,व्ही आर पाटील ,यांनी गावातील सहा तर वळपाडा येथील गाव कमिटी सदस्य रणसुल पाटील,
भास्कर पाटील ,संदीप पाटील ,अरुण पाटील,इंद्रपाल पाटील यांनी इच्छुक उमेदवारांची समजूत काढून गावातील निवडणूका बिनविरोध घडवून आणल्या असून त्यांच्या या प्रयत्नां नंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे .
तर आलिमघर येथील सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी राखीव पदासाठी एक ही अर्ज दाखल न झाल्याने उर्वरित सहा जागांसाठी गाव कमिटीतील दीपक पाटील ,अँड संजय पाटील ,महादेव घरत यांनी सर्वसमत्तीने उमेदवार निवडून इतरांचे अर्ज माघारी घेण्यात यश मिळविल्याने गावात निवडणूक होणार नसल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे .
भिवंडीत वळ आलिमघर ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध भिवंडीत वळ आलिमघर ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads