२८हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे २५ कोटी रुपये जमा
◆भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश....
भिवंडी, प्रतिनिधी : कोरोनाबरोबरच अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने पिकविम्याची सुमारे २५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम अंतिम टप्प्यात आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वाडा तालुक्यातील वाडा कोलम ही भाताची जात लोकप्रिय आहे. तर मुरबाड तालुक्यातील झिनी भातालाही खवय्यांची मागणी आहे. या दोन्ही तालुक्यांबरोबरच भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण ग्रामीण, बदलापूर ग्रामीण भागातही शेतकऱ्यांकडून भाताचे उत्पादन घेतले जाते. मात्र, कोरोनामुळे व्यवहारांवर मर्यादा आल्या असतानाच, अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तुटपूंजी मदत केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कृषी विभागाकडून पिकविमा योजना राबविण्यात आली होती. मात्र, त्या विम्याची रक्कम मिळण्यास अडचणी येत होता. त्यासंदर्भात खासदार कपिल पाटील यांनी लक्ष घातल्यानंतर विमा कंपन्यांच्या कारभाराला वेग आला. त्यानंतर भिवंडी तालुक्यातील ६ हजार ९२६ शेतकऱ्यांना ५ कोटी ८० लाख ८६ हजार ५६१, शहापूर तालुक्यातील ११ हजार ४८२ शेतकऱ्यांना १० कोटी ७६ लाख २१ हजार ७८७, मुरबाड तालुक्यातील ९ हजार ८६६ शेतकऱ्यांना ८ कोटी ३८ लाख ८८ हजार ६४५ असे एकूण २८ हजार २७४ शेतकऱ्यांना २४ कोटी ९५ लाख ९६ हजार ९९३ रुपयांच्या पिकविम्याचे वाटप करण्यात आले.
तर वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
२८हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचे २५ कोटी रुपये जमा
Reviewed by News1 Marathi
on
January 31, 2021
Rating:

Post a Comment