खोणी गावात खंडोबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार
डोंबिवली , शंकर जाधव : विष्णू ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ खोणी गावातील खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा तीन दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला. शांती सुक्त पाठ, गणेश पूजन, मंडप प्रवेश, वास्तू मंडळ, तसेच मिरवणूक सोहळा पार पडला.त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली. कोकणरत्न ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारींगे तसेच ह.भ.प.राम राज महाराज ढोक तसेच यज्ञाचार्य अनिल महाराज जोशी उपस्थित होते.त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रगतीचा संदेश त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.
हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे असून मंदिरातील मूर्तीचे दगड कर्नाटक मधील असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. मंदिरात गणपती, खंडोबा आणि म्हाळसा देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी परमेश माळी यांचा मिरवणूक स्पेशल ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. तसेच खोणी येथील जागर भजन हनुमान प्रासादिक भजन मंडळ , श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ वावंजे यांचे भजन कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.माजी सरपंच हनुमान ठोंबरे यासह अनेक गावकरी अथक मेहनत घेत होते.

Post a Comment