Header AD

लिफ्टमध्ये अडकलेल्या ३ महिलांची अग्नीशमन दलाकडून सुखरुप सुटका

 

■३ महिलांमध्ये ६२ वर्षीय  हार्ट पेशंट असलेल्या आजीबाई चा  समावेश    
                        
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे   :-   कल्याण पश्चिमेतील हायफाय सोसयटीच्या इमारतीच्या     लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिलांची सुखरुप सुटका करण्यात कल्याण अग्नीशन दलाला यश आले. या तीन महिलांमध्ये एक महिला वयोवृद्ध हार्ट पेशंट समावेश होता. 


कल्याणच्या गोदरेज हिल्स येथील हाय प्रोफाईल व्होला इमारतीत आज सकाळी साडे अकरा वाजता घडला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी विनिता हुबळीकर, सुषमा म्हारुळकर यांना बाहेर काढले. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या  ६२ वर्षीय शीतल हुबळीकर या हार्ट पेशंट असल्याने त्यांना सुखरुप काढण्यासाठी मेहनत घ्यावा लागली. लिफ्ट रुममध्ये जाऊन लिफ्टचे ब्रेक मॅन्युअली डाऊन करण्यात आले. लिफ्ट चौथ्या माळ्यावर आणली गेली. सात मजल्याच्या इमारतीच पाच आणि चौथ्या मजल्यामध्येच अडकली होती लिफ्ट अशी माहिती अग्नीशमन दलाचे जवान विनायक लोखंडे यांनी दिली आहे.
लिफ्टमध्ये अडकलेल्या ३ महिलांची अग्नीशमन दलाकडून सुखरुप सुटका लिफ्टमध्ये अडकलेल्या ३ महिलांची अग्नीशमन दलाकडून सुखरुप सुटका Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads