Header AD

स्वयंपाक घराच्या भांड्याच्या मांडणीत आढळली धामण तर देवघरात जाऊन बसला नाग दोन्ही सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान

                       
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण पश्चिमेतील सापार्डे गावात स्वयंपाक घराच्या भांड्याच्या मांडणीत धामण आढळली तर  रोनक सिटी परिसरात पत्र्यावजा घराच्या देवघरात नाग आढळल्याने घरातील कुटुंबायांची पळता भुई उडाली. घटना स्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे ,हितेश करंजगावकर  यांनी पोहचत दोन्ही सापांना पकडून जीवनदान दिले.     


           कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावातील नरेश भगत यांच्या स्वयंपाकघराच्या भांड्याच्या मांडणीत रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास  सापआढळल्याने घराच्या गुहिणीची भितीने पळताभुई उडाली.  घरातील सदस्यांनी सर्पमित्राला  काँल केला. घटनास्थळी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे हितेश करजंगावकर यांनी पोहचत  भांड्याच्या मांडणीत वेटोळे घालुन बसलेल्या धामण प्रजाती च्या साडेसात फुटी बीन विषारी सापास पकडून जीवनदान दिल्याने भगत कुटुंबातील सदस्यांनी सुटेकेचा निश्वास टाकला.   
               

   तर रोनक सिटी परिसरात बिगारी काम करणाऱ्याच्या पत्र्यावजा घरात देवघरात रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास नाग दिसल्याने  आढळल्याने मजुर कुटुंब भितीने घराबाहेर पडले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी पोहचत साडेचार फुटी विषारी नागाला पकडुन जीवनदान दिले.       पकडलेल्या दोन्ही सापांना वनपाल एम् डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडले.
स्वयंपाक घराच्या भांड्याच्या मांडणीत आढळली धामण तर देवघरात जाऊन बसला नाग दोन्ही सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान स्वयंपाक घराच्या भांड्याच्या मांडणीत आढळली धामण  तर देवघरात जाऊन बसला नाग दोन्ही सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads