Header AD

डोंबिवलीत निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात दरोडा दरोड्यात महिलेचा समावेश, १२ तासात तीन आरोपी अटकेत


 
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील सुरजमनी इमारतीत राहणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात दरोडा पडल्याची घटना घडली. मात्रमुलीने प्रसंगावधान दाखवून दरोडेखोराना प्रतिकार केला.त्यामुळे दरोडेखोरांनी पकडण्याच्या भीतीने पळ काढला.दरोडेखोरांनी घरातील काही रोकड आणि आणि मोबाईल फोन घेऊन गेले.पंरतु दरोडेखोरांच्या टोळीतील एकाचा मोबाईल घरातच पडल्याने या  मोबाईल द्वारे चोरट्याचा माग काढत पोलिसानी १२ तासात तीन आरोपींना अटक केली. तर या दरोड्यात सामील झालेल्या फरार महिलेचा पोलीस कसून शोध घेत आहे.भरदिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.मिळालेल्या माहितीनुसार,  चेतन रजनीकांत मुकवाणी ( ३८, रा. ठाणे-रघुवीरनगर),दिनेश,जयस्वाल,रावल( ४२,रा.डोंबिवली सुरजमनी इमारती ) आणि ठाकुर्ली येथील रिक्षाचालक ( ४९ ) असे तिघा दरोडे टाकणाऱ्यांनी नावे असून विष्णूनगर पोलिसांनी तिघा आरोपीना अटक केली आहे.तर या दरोड्यात एका महिला समील झाली होती.डोंबिवली पश्चिमेकडील सुरजमणी इमारतीत अशोक गिरी हे पत्नी व मुलगी प्रतीक्षाबरोबर राहतात. अशोक गिरी हे हे अपंग असून निवृत्त बँक अधिकारी आहेत. गिरी यांची पत्नी आणि मुलगी मंगळवारी  जानेवारी रोजी  संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या.त्यावेळी दबा धरून बसलेल्या तीन  दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. पाठमोऱ्या बसलेल्या गिरी यांना काही समजण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांचे हात खुर्चीला , त्यांच्या तोंडावर पट्टी चिकटवून गिरी आणि त्यांच्यामुलगी घरी येण्याची वाट पाहत होते. कारण गिरी यांची पत्नी आणि मुलगी घरी आल्यावर घरात कुणी येणार नाही आणि घरात कुठे सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवले आहे याची माहिती मिळेल. इतक्यात त्यांची मुलगी घरात आली,दरोडेखोरांनी दरवाजातच तिला पकडून  तिच्या तोंडाला पट्टी बांधून तिचे हात बांधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत या मुलीने आरडाओरडा करत दरोडेखोरांना प्रतिकार केला.यात तिच्या पायाच्या अंगठ्याला लागले.आवाजाने शेजारी धावत आल्याने दरोडेखोरांचा प्लान फसला पकडले.जाण्याच्या भीतीने त्याने पळ काढला. मात्र मुलीबरोबर झालेल्या झटापटीत चोरट्यांच्या हातातून पडलेला फोन फोन उचलला. इतका वेळ त्याला न मिळाल्याने हा फोन पोलिसांच्या हाती लागला या फोनवरून पोलिसांनी माग काढत ठाण्यातून एका आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गिरी यांच्या इमारतीत राहणारा दिनेशने हा दरोडाचा प्लान आखल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिनेश, चेतन आणि अब्दुलला अटक केली आहे.विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बडणे,पोलीस नाईक कुरणे, पोलीस शिपाई कुंदन भांबरे, मनोज बडगुजर आणि भगवान सांगळे यांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.  


 

 चौकट

 

असा होता दरोड्याचा प्लान


 

सुरजमनी इमारतीत गेल्या ३० वर्षापासून राहत असलेला दिनेश रावल फुल विकण्याचा व्यवसाय करतो. त्याच्या घरी चेतन हा नेहमी यायचा.झटपट पैसे कमविण्यासाठी या दोघांच्या डोक्यात कुटील डाव शिजत होता. अश्या वेळी दिनेशने आपल्या इमारतीत गिरी हे अपंग असून ते निवृत्त बँक अधिकारी असून त्याच्यांकडे भरपूर पैसे असतील असा विचार केला.घरात सहज दरोडा टाकून पैसे कमविता येतील या विचाराने दिनेशने एक प्लान बनवला.दिनेशने काही दिवस गिरी याच्या घरावर पाळत ठेवली.दिनेश हा इमारतीच्या तिसर्या मजल्यावर राहत असून गिरी हे दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यामुळे दिनेशने जातायेता गिरी यांच्या घराकडे लक्ष दिले. घराचे दरवाजे काही वेळेस उघडे असल्याचे बाब दिनेश निदर्शनात आली. मग काय यावेळेच घरात घुसायचे असा दोघांच्या प्लान होता.यासाठी  त्यांनी एम ओळखीच्या महिलेचा आणि ठाकुर्लीतील रिक्षाचालक अब्दुल या दोघांना दरोड्यात सामील केले.

 


माझ्या मुलीने हिम्मत दाखवली म्हणून आज मी जिवंत...


 

घरात घुसलेल्या तिघांपैकी एकाने गिरी याच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. दरोडेखोर आपला जीव घेणार या भिताने गिरी यांनी प्रतिकार केला नाही. मात्र त्यांची मुलगी प्रतीक्षा यांनी दरोडेखोराना प्रतिकार केल्याने ते पळाले. माझ्या मुलीने हिम्मत दाखवली म्हणून मी आज जिवंत आहे असे गिरी यांनी सांगितले.    

डोंबिवलीत निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात दरोडा दरोड्यात महिलेचा समावेश, १२ तासात तीन आरोपी अटकेत डोंबिवलीत निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात दरोडा दरोड्यात महिलेचा समावेश, १२ तासात तीन आरोपी अटकेत Reviewed by News1 Marathi on January 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads